<strong>मुंबई : </strong>महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-on-bogus-seeds-issue-784272
0 Comments