Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांमध्ये भीतीदायक वाढ; मृतांचा आकडाही वाढला

कोरोना विषाणू साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच महाराष्ट्रावरही कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. ज्यामुळं नियंत्रणात येऊ पाहणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लादगला आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.

आजपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 10 रुपयांनी कपात; नवे दर आजपासून लागू

एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलेंडर्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि आता कमी करण्यात आलेली किंमत यात बरीत तफावत आहे. परंतु त्यातून थोडा का होईना दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.

जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या 2021-22 मध्ये लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा सर्व योजनांवरील व्याज दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका बसला आहे. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-april-1-2021-maharashtra-political-news-gas-cylinder-april-fools-day-2021-980344

Post a Comment

0 Comments