<p><strong>Coronavirus :</strong> कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-animal-spreaded-corona-virus-report-by-world-health-organization-980103
0 Comments