Maharashtra Corona LIVE Updates : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे-कुठे काय-काय निर्बंध?

राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.  राज्यात कोरोनाची संख्या वाढते, याबाबत चिंता आहे.  सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.

राज्यात 'इतक्या' कोरोनाबाधितांची वाढ; बरं होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या बाधितांचा आकडा जास्तच

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करत परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, याची माहिती देण्यात येते. सोमवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 20854 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रग्णालयातून रजा देण्यात आली. तर, दिवसभरात 31 हजार 643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.  राज्यात नव्यानं आढळणाऱ्य़ा कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमीच दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर मृत्यूदर 1.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात कोरोनामुळं 102 जणांचा मृच्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विविध भागांमध्ये 336584 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला आहे. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-corona-live-updates-covid-19-lockdown-news-cases-mumbai-nagpur-nashik-aurangabad-pune-state-reports-cm-uddhav-thackeray-roadmap-980106

Post a Comment

0 Comments