Rashmi Thackeray Health | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्याना काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंना मुंबईतील रुटीन चेक अपसाठी रिलाएन्स एच एन रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.  मात्र काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. मुफी यांच्या देखरेखीत रश्मी ठाकरेंवर उपचार सुरु आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. अशातच आता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता.

राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 2400727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच आजच्या दिवशी कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pm-narendra-modi-calls-cm-uddhav-thackeray-inquires-about-wife-rashmi-thackeray-health-980364

Post a Comment

0 Comments