Breaking News LIVE : रायगड जिल्ह्यात पुरवलेल्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

Maharashtra Corona : तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या  जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड  परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

Maharashtra Coronavirus Crisis : राज्यात लॉकडाऊन वाढवला, 15 मे पर्यंत कठोर निर्बंध कायम
राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसै थे होती.  त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

Maharashtra Corona Cases : राज्यात आज नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात आजही तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दिलासायदायक म्हणजे आज नवीन 68 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3799266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.

Exit Poll Result 2021 : बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा अंदाज
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे.

from maharashtra https://ift.tt/3tdWXWN
via IFTTT

Post a Comment

0 Comments