Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर

कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू, मलकापुरातील धक्कादायक प्रकार
बुलढाण्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालाय आणि कोविड सेंटरमधील वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याने, रुग्णालयात भरती असलेल्या 25 रुग्णांचे प्राण टांगणीला लागले होते. त्यातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर असलेल्या एका कोविड रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले. हा धक्कादायक प्रकार तब्बल दीड तास सुरु असल्याने कोविड सेंटरमधून रुग्ण बाहेर आले होते. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे.

18 ते 44 वयोगटासाठी राज्यात आजपासून मोजक्या स्वरुपात लसीकरण
राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटासाठीही लसीकरण सुरु होणार आहे. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे.  या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज हे लसीकरण सुरु होणार आहे. तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. तर राज्यातील विविध जिल्ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 10 हजार, 7500 आणि 5000 डोस असे वाटप करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या स्थिरावली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे.  रु्ग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.

from maharashtra https://ift.tt/3gRZza5
via IFTTT

Post a Comment

0 Comments