Crisper Cass: 'क्रिस्पर कॅस'ने होणार कोरोनाचे अचूक आणि जलद निदान, टाटा समूहाने विकसित केलं नवं तंत्रज्ञान

मुंबई: देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कमी वेळेत जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. अशा वेळी टाटा समूहाने विकसित केलेलं क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान मदतशीर ठरण्यची शक्यता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत-कमी वेळेत जास्तीत जास्त चाचण्या तसेच केवळ दोन-तीन तासाच कोरोनाचे निदान होणार आहे.

कोरोना चाचणी करण्यासाठी आता टाटा समूहाकडून क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान  विकसित केले आहे. देशात उद्यापासून मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदाच टेस्टिंग लॅबमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात येत आहे. कोरोना चाचणीसाठी अचूक आणि जलद तंत्रज्ञान म्हणून याकडे पाहिलं जातंय. RTPCR आणि अँटिजेन कोरोना चाचणीपेक्षाही अचूक आणि जलद परिणाम या चाचणीमध्ये येईल असं सांगितलं जातंय.

क्रिस्पर कॅस करोना चाचणी तंत्रज्ञानाचा वापर करुन 24 तासात साधारपणे  500 ते 2000 करोना चाचण्या करता येणे शक्य होईल. त्यामुळे चाचण्यांचा वेगही वाढेल. स्वॅब टेस्ट केल्यानंतर केवळ दोन ते तीन तासात या चाचणीचा अचूक रिझल्ट या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळणार आहे. एका अॅपच्या माध्यमातून ही चाचणी करणाऱ्यांच्या मोबाईलवर संबंधिताचा कोरोना अहवाल पाठवला जातो.

इतर कोरोना व्हेरिएन्ट जे बऱ्याचदा सध्याच्या चाचण्यांमध्ये डिटेक्ट होत नाहीत ते सुद्धा या चाचणी मध्ये समोर येतील. क्रिस्पर कॅस चाचणी संबंधी लवकरच मोबाइल लॅब सुद्धा सुरू केली जाणार आहे.

पहा व्हिडीओ: Web Exclusive : टाटा समूहानं विकसित केली क्रिस्पर कॅस कोरोना टेस्ट, किती वेळात मिळणार रिझल्ट?

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2PA9BBs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधणार, लसीकरण आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्याची शक्यता

<a href="https://ift.tt/3u1VmEu Lad | मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन, 34 व्या वर्षी जगाचा निरोप

जातीय मतभेद विसरून कोरोना काळात मदत, ग्रँट रोड परिसरातील हिंदू-मुस्लिम एकता कमिटीकडून गरजूंना मदतीचा हात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/tata-group-technology-crisper-cass-to-provide-accurate-fast-diagnosis-of-corona-new-984528

Post a Comment

0 Comments