<p>रायगड जिल्ह्यात पुरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. तांत्रिक कारणामुळे हेटेरो हेल्थकेअर कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रायगड जिल्ह्याला 500 इंजेक्शन पुरवण्यात आले होते, त्यापैकी 120 इंजेक्शन देण्यात आले. कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा वापर करु नये असं अन्न व औषध प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-fda-orders-to-stop-use-of-remdesivir-in-raigad-district-984504
0 Comments