Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 एप्रिल 2021 शुक्रवार | ABP Majha

1. राज्यभरात काल तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतल्या रुग्णांत 8 हजार 643 जणांची भर

2. काल दिवसभरात राज्यात 3 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण, पुण्यात सर्वाधिक 57 हजार तर मुंबईत 50 हजार जणांचं लसीकरण

3. सचिन वाझेसोबत प्रवास करणारी महिला एनआयएच्या ताब्यात, वाझे आणि शिंदे ऑडीतून प्रवास करतानाचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती

4. नाशकात तूर्तास लॉकडाऊन नाही, तर पुण्यातल्या निर्बंधांबाबत आज अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

5. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरु राहणार

6. कोरोना पाठोपाठ एक नवे संकट, राज्यात फक्त पाच दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध

7. 'वर्क फ्रॉम होम'साठी राज्य सरकारची चाचपणी, सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता

8. ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही; उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका

9. अभिनेत्री आलिया भटलाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती, तर बिग बीनं घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

10. पाकिस्ताननं भारतातून कापूस आणि साखर आयात करण्याचा प्रस्ताव फेटाळला; काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करेपर्यंत आयातीवर बंदी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-02-april-2021-friday-980474
0 Comments