Break The Chain | ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?

ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

यासाठी 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

<a href="https://ift.tt/3i2ScgH Uddhav Thackeray Speech: संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी परीक्षांचा गोंधळ अद्याप कायम आहे. दहावीस बारावी परीक्षांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे, आता बारावी परीक्षांचा देखील घेणार आहोत. परंतु एका राज्यात होत आहे, दुसर्‍या राज्यात नाही असे न करता एकसमान निर्णय घेतला जायला हवा. धोरण एक हवे. माननीय पंतप्रधानांना यापूर्वी देखील विनंती केली आहे, परत करणार आहे. शिक्षण क्षेत्राबाबत क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

कोरोनामुक्त गाव मोहिम राबवायची गरज

कोरोनाची रुग्णसंख्या शहरी भागात कमी होत आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गाव पातळीवर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी हे करुन दाखवलं आहे. घाटणे, तालुका मोहोळ गावचे ऋतुराज देशमुख, तर कोमल करपे, आंतळुली, दक्षिण सोलापूर या दोन तरुण संरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे. आपल्याला देखील आता कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

from maharashtra https://ift.tt/2R5jnw7
via IFTTT
0 Comments