<p>काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी खेडकेर कुटुंबियांना कोरोनाची लागण झालेली होती. </p> <p>खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे. सर्वात आधी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच 25 मे रोजी निधन झालं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं. खेडकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसांत तिघांचं कोरोनामुळे निधन झाल्यानं सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-veteran-tamasha-artist-kantabai-satarkar-daughter-and-grandson-dies-due-to-corona-989077
0 Comments