<p>वारकऱ्यांसाठी खुशखबर आहे. देहूमध्ये आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला एकूण 350 जणांना परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30) हा आदेश देण्यात आला. या पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा 250 भाविकांना परवानगी सोहळ्याला हजर राहण्याची परवानगी देण्यात आला आहे. </p> <p>तर आळंदी इथून उद्या (2 जुलै) प्रस्थान होणाऱ्या ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला पूर्वीच्या 100 वारकऱ्यांसह जादा 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ashadhi-ekadashi-wari-2021-increased-the-number-of-warakari-for-the-palkhi-sohala-992868
0 Comments