Ashadhi Wari 2021 : संत तुकोबा आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज प्रातिनिधिक प्रस्थान

पुणे/औरंगाबाद : यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadhi Wari 2021) कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (1 जुलै) प्रस्थान होईल. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होणार आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरुन एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे

देहूत आज सकाळपासूनच मंदिरात विधीवत पूजाअर्चा सुरु आहे. दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचं प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होईल. त्यानंतर 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील.

असा पार पडेल पालखी सोहळा प्रस्थान
- पहाटे चार ते पाचच्या दरम्यान सर्व देवतांची पूजा
- सकाळी नऊ ते बारा दरम्यान सप्ताच्या कार्ल्याचे कीर्तन
- दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरुवात
- प्रस्थानानंतर पादुका मुख्य मंदिरातच मुक्कामी राहतील

खासदार संभाजीराजे छत्रपती सहकुटुंब पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा दोन वाजता सुरु होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी संयोगिताराजे आणि पुत्र शहाजीराजे छत्रपती हे उपस्थित राहणार आहेत. प्रस्थान झाल्यानंतर परंपरेप्रमाणे पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी कीर्तन मंडपात ठेवून संध्याकाळी सहा वाजता समाज आरती, कीर्तन, जागर होईल.

एकनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी तयारी पूर्ण
तर पैठणमध्येही प्रस्थानाची तयारी सुरु झाली आहे. दुपारी साडेबारा वाजता संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल. प्रथम पालखी जुन्या वाड्यातून समाधी मंदिरापर्यंत जाईल. विधीवत प्रस्थान झाल्यानंतर पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असेल. 19 जुलै रोजी पालखीचं पंढरपूरच्या दिशेने एसटीने प्रस्थान होईल.

या दहा पालख्यांना परवानगी

- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
-  संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडनेपूर-अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
- संत चंगतेश्वर महाराज (सासवड)

वारकऱ्यांसाठी खुशखबर, पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहणाऱ्यांची संख्या वाढवली
दरम्यान वारकऱ्यांसाठी खुशखबर आहे. देहूमध्ये आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला एकूण 350 जणांना परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30) हा आदेश देण्यात आला. या पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा 250 भाविकांना परवानगी सोहळ्याला हजर राहण्याची परवानगी देण्यात आला आहे.

तर आळंदी इथून उद्या (2 जुलै) प्रस्थान होणाऱ्या ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला पूर्वीच्या 100 वारकऱ्यांसह जादा 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/representative-departure-of-the-palkhi-of-sant-tukaram-maharaj-and-sant-eknath-maharaj-today-992844

Post a Comment

0 Comments