BHR Scam : सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या जितेंद्र कंडारेला अखेर बेड्या

जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर इथून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती पाहता पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता कमी दरात आपल्या हितचिंतकांना देऊन त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. यामध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झंवर अद्यापही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?
बीएचआर म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. देशभरात सात राज्यात या संस्थेच्या 264 शाखा असून 28000 हजार ठेवीदारांच्या 1100 कोटी रुपयांच्या ठेवी यामध्ये अडकून पडल्या आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा 2015 ला खऱ्या अर्थाने समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याच काळात ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत करता याव्या यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कांडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता या मालमत्ता काही ठराविक लोकानांच अतिशय कमी किंमतीत मातीमोल भावात विकल्या होत्या. या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या.

या संदर्भात काही संचालकांसह अवसायकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. यामध्ये जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे, संजय तोतला, तर जामनेरमधील  जयश्री मणियार, राजेश लोढा, छगन झालटे आणि भुसावळ इथल्या आसिफ तेली यांचा समावेश आहे. या कर्जदारांनी कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन ते न फेडता अॅडजस्ट केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावा सापडल्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं. परंतु मुख्य सूत्रधार असलेला प्रशासक जितेंद्र कांडारे आणि सुनील झंवर हे सात महिन्यांपासून फरार झाले होते. आता जितेंद्र कंडारेला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे.

दरम्यान भाईचंद हिराचंद रायसोनी अपहाराचा फरार असलेला मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्ती असल्याचं समजतं. त्यातच सुनील झंवरकडे केलेल्या छापेमारीत गिरीश महाजन यांचं लेटर हेड आढळून आलं होतं.

संबंधित बातम्या

बीएचआर घोटळाप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने, लवकरच नावे जाहीर करणार : एकनाथ खडसे

बीएचआर घोटाळाप्रकरणात मोठ्या व्यक्तीचं नाव, एकनाथ खडसेंचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-jalgaon-bhr-scam-jitendra-kandare-who-has-been-absconding-for-seven-months-is-finally-arrested-992569

Post a Comment

0 Comments