<div dir="auto"> <p><strong>जळगाव :</strong> राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर इथून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती पाहता पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.</p> <p>बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता कमी दरात आपल्या हितचिंतकांना देऊन त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. यामध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झंवर अद्यापही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.</p> </div>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bhr-state-cooperative-credit-society-scam-jitendra-kandare-arrested-992574
0 Comments