<p style="text-align: justify;">कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन योजनेची घोषणा करणार आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे दोनही पालक मृत्यू पावले त्या बालकांच्या नावे प्रत्येकी पाच लाखांची ठेव ठेवली जाणार आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमवालेले राज्यात 172 बालकं आहेत. तर एक पालक गमावलेले 5 हजार बालक आहेत. ही ठेव 18 आणि 21 वर्षानंतर बालकांना मिळणार आहे. या बालकांना बालसंगोपन केंद्रात ठेवणार किंवा ज्यांचे नातेवाईक संगोपन करण्यास तयार आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी देणार आहे. बालसंगोपन योजनेप्रमाणे दरमहा नातेवाईकांना संगोपन भत्ता दिला जाणार आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना थेट मदत करणार महाराष्ट्र पहिल राज्य आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-covid-orphans-in-maharashtra-to-get-rs-5-lakh-as-fd-989210
0 Comments