<a href="https://ift.tt/3doRgjn Reservation बाबत आज जी परिस्थिती, त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणीस अन् भाजप जबाबदार, एकनाथ खडसेंचा आरोप

"मंडळ आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळीही भाजपने मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. व्हिपी सिंग यांचा पाठिंबा काढला आणि ते सरकार कोसळलं ते एकाच मुद्यावर कोसळलं होतं, आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले?", असं म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

"2011 रोजी ओबीसींची जातनिहाय गणना झाली, जन गणना केंद्र सरकार करीत असल्याने डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. हा डाटा मिळविण्या साठी देवेंद्र फडणीस यांनी मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे, तशीच मागणी पंकजा मुंडे यांनीही केली होती. मात्र दिल्लीत भाजपाच सरकार असताना आणि तुम्ही राज्यात सत्तेत असताना, तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडे पणाचा आहे. या सर्व प्रकाराला तुम्हीच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात.", असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मोबाईल नेटवर्कच्या शोधात मुलं झाडावर चढली; वीज पडून एक मृत्युमुखी; तीन जखमी

मोबाईल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात सोमवार, 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास झाडावर वीज पडून हा अपघात घडला.

डहाणू तालुक्यात सोमवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाईल रेंज मिळण्यासाठी उंबराच्या झाडावर चढली होती. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज पडली पडल्याने रविन बच्चू कोरडा (वय 17 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. चेतन मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) आणि मेहुल अनिल मानकर (वय 12 वर्षे) हे जखमी आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मेहुल याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-june-29-2021-maharashtra-political-news-coronavirus-update-992559
0 Comments