Eknath Khadse Meets Sharad Pawar : एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला; मुंबईतील निवासस्थानी घेतली भेट

मुंबई : भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार आजारी होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रीया करण्यात आल्या होत्या. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. अशातच अनेक नेते शरद पवारांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आज राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशातच काल (मंगळवारी) देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन देखील उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ खडसे मात्र त्यांच्या घरी नव्हते, तर ते मुंबईत होते. यावरुनही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या दौऱ्यादरम्यान, रक्षा खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली होती.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-eknath-khadse-meets-ncp-chief-sharad-pawar-989098

Post a Comment

0 Comments