Ganpatrao Deshmukh passes away : गणपतराव देशमुख यांचा नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची प्रतिक्रिया

<p>&nbsp;महाराष्ट्रात सर्वाधिक काळ आमदार असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकीर्दीचं तेच गमक होतं. अत्यंत साध्या राहणीमुळं सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत. गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल अकरावेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. गणपतराव देशमुखांवर सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ganpatrao-deshmukh-passes-away-grandson-dr-aniket-deshmukh-reaction-996792

Post a Comment

0 Comments