Maharashtra Unlock : निर्बंध शिथिल करण्याची नाशिकमधील व्यापाऱ्यांची मागणी

<p>नाशिकमधले निर्बंध हटवण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलंय. टास्क फोर्सच्या बैठकीनंतरच शिथिलता द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे..पालकमंत्री भुजबळांनी हे वक्तव्य केल्यानं नाशकातले निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतलाय..यात नाशिकचाही समावेश आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान भुजबळांच्या वक्तव्यानंतर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय...निर्बंधातून लवकरात लवकर सूट देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nashik-traders-in-maharashtra-unlock-996786

Post a Comment

0 Comments