Zika Virus : महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तिला झिका नावाच्या विषाणुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो.. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

<a href="https://ift.tt/3ihprwm Virus: राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण, पुरंदरमधील रुग्ण बरा झाला मात्र प्रशासनाकडून खबरदारी

काय आहे झिका आजार..
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

काळजी कशी घ्याल?
-घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
- घरामध्ये व परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये
-ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे. तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
- हा आजार संसर्गजन्य नाही.
- झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
- या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे..
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/first-case-of-zika-virus-in-maharashtra-know-zika-virus-symptoms-996903
0 Comments