<p style="text-align: justify;">Ratnagiri : गणेशोत्सवासाठी जर कोकणात जाण्याचा विचार करत असाल, तर एकतर तुमच्याकडे कोरोना लसीचे दोन डोस झाल्याचं सर्टिफिकेट हवं किंवा RTPCR चाचणी बंधनकारक असेल. रत्नागिरी प्रशासनानं नियमावली जाहीर केली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असल्यास लसीचे 2 डोस किंवा RTPCR अनिवार्य असणार आहे.</p> <p style="text-align: justify;">कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला (Ganesh Utsav 2021 )सुरूवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या साऱ्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली गेली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तिला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान 72 तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी सदर व्यक्तिची चाचणी केली जाईल. यावेळी चाचणी पॉझिटीव्ह आल्यास सदर व्यक्तिला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तिला मात्र यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-ganoshotsav-guidelines-that-completely-vaccination-or-rtpcr-is-manditory-1001023
0 Comments