<a href="https://ift.tt/3t1RIKY Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकणात काय स्थिती असणार?

कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज?

मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

<a href="https://ift.tt/3gKCUM8 Vaccine : 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा, आरोग्य विभागाचे आदेश

राज्यातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे, सोबतच शिक्षक दिनापूर्वी सर्व राज्यातील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले होते.

<a href="https://ift.tt/3gJSesc Local : केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा का? निर्बंधांविरोधात हायकोर्टात नवी याचिका

त्या अनुषंगाने 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील शिक्षकांचे प्राध्यानक्रमाने लसीकरण करण्याबाबत सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रत्येक गावात, शहरात आणि महापालिका हद्दीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड 19 लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-31-2021-maharashtra-political-news-1001272
0 Comments