<p>काल रत्नागिरीत मोठे गौप्यस्फोट केल्यानंतर, नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा रात्री सिंधुदुर्गात दाखल झाली... सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश असतानाही नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यावर ठाम आहे. त्यामुळं प्रशासन काय पाऊलं उचलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय...तसंच कालच्या टीकेनंतर राणे आज कोणते बॉम्ब फोडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल...तर दुसरीकडे काल नारायण राणेंचं स्वागत करण्यासाठी समर्थकांनी कणकवलीत मोठी गर्दी करत, जमावबंदीचं उल्लंघन केलं. त्यामुळं पोलीस त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उचलणार का हे पहावं लागेल...</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/politics-bjp-mla-ashish-shelar-on-narayan-rane-sindhudurg-jan-ashirwad-yatra-even-in-curfew-1000860
0 Comments