<p style="text-align: justify;">नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता टीका केली आहे. काही जुन्या व्हायरसमुळे साईड-इफेक्ट होत आहेत आणि जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, "सर्वांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणं पाहात असतात. मधल्या काळात तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी एक शब्द वापरला होता. रिव्हेंज टुरिझम. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. ते लक्षात आलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं. जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं नाही आणि पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की, पुन्हा हे संकट येऊ शकेल", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-want-to-get-rid-of-the-old-virus-says-cm-uddhav-thackeray-on-narayan-ranes-political-tourism-virus-1000682
0 Comments