Dhule : चाळीसगाव चौफुली परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला लागलेली आग नियंत्रणात ABP Majha

<p>मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली परिसरात महामार्ग पोलीस चौकीच्या समोर एका प्लास्टिकच्या गोडाऊनला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग प्लास्टिकच्या गोडाऊनला लागली . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गोदाम बंद असल्यामुळे याठिकाणी कामगार नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भर पावसात ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे...</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-dhule-chalisgaon-fire-1001440

Post a Comment

0 Comments