<p>जळगाव जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. जळगाव जिल्हा बॅंकेच्या हिताचा विचार करता सहकारामध्ये राजकारण नको म्हणून तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्वपक्षांच्या संमतीने सर्वपक्षीय पॅनल उभारून हा पायंडा पाडला आणि याच पार्श्वभूमीवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-jalgaon-will-jalgaon-district-bank-election-be-uncontested-abp-majha-1001127
0 Comments