<p>पावसाने दडी मारल्याने उडीद पीकाला प्रचंड फटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी या गावातील शेतकऱ्याने आपल्या ४ हेक्टरवरच्या उडीद पीकावर अक्षरशः नांगर फिरवला आहे. कल्याणी संभाजी घोडके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद मूग आणि सोयाबीन ही पीके पावसाअभावी करपून जाऊ लागली आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-osmanabad-osmanabad-farmer-distroy-4-hector-urad-field-abp-majha-1001121
0 Comments