<p>सुशांत सिंग मृत्यूप्रकरणाच्या तपासावरुन सीबीआय विरुद्ध राज्य सरकार वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सीबीआय आणि ठाकरे सरकार वाद रंगण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावलंय. मात्र या दोघांनीही सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय. सीबीआयने कार्यालयात येऊन माहिती घ्यावी असा पवित्रा या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतलाय. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कुठे असा प्रश्न विचारण्यात येतोय. गेल्या तीन महिन्यांपासून देशमुख त्यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे काटोलमध्ये फिरकलेलेही नाहीत. तर तिकडे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अटक होण्याच्या भीतीनं देश सोडून परदेशात पोबारा केला असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-anil-deshmukh-case-chief-secretary-sitaram-kunte-and-director-general-of-police-sanjay-pandey-summoned-by-cbi-1005785
0 Comments