<p>मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील ठोस पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. तर दुसरीकडे अनिल देशमुखही गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या मतदार संघात फिरकलेले नाहीत. याच मुद्द्यावर बोट ठेवत, भाजपनं अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-when-will-anil-deshmukh-return-to-the-constituency-question-by-bjp-leader-chandrashekhar-bawankule-1005647
0 Comments