<a href="https://ift.tt/3EUs2Wm Dept Exam Date: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा

Maharashtra Health Dept Exam Date Update : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबरला तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता.

ऐन वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही? याबद्दलही साशंकता असून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. राजेश टोपे यांनी काल (सोमवारी) मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असं सांगितलं होतं. त्यानुसार वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.

यंदाही कोरोना सावटात आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव, लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. मंदिर समितीनं दिलेल्या माहितीनुसार, यंदा नवरात्रोत्सवात दररोज 60 हजार भाविकांनाच तुळजाभवानी मातेचं दर्शन घेता येणार आहे. तसेच कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात तीन दिव, उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापुरात प्रशासनाच्या वतीनं संचारबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत.

पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून अनेक भाविक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसांत एकही वाहन किंवा भाविकांना जिल्ह्यात येण्यास बंदी असेल.

पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-28-2021-maharashtra-political-news-1005330
0 Comments