Maharashtra Health Dept Exam Date Update : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबरला तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता.

ऐन वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही? याबद्दलही साशंकता असून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. राजेश टोपे यांनी काल (सोमवारी) मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असं सांगितलं होतं. त्यानुसार वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.

आरोग्य भरतीतील गोंधळाला कारणीभूत कंपन्यांवर कुणाची मेहेरबानी? कंपन्यांच्या गोंधळाची परंपरा आधीपासूनची

नेमका प्रकार काय?

नोव्हेंबर 2016 मध्ये पंजाब सरकारनं NYSA या कंपनीला तेथील गैरकारभार प्रकरणी तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केलं होतं. पुढे उच्च न्यायालयातून ही कंपनी ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडली. 2017 ला महाराष्ट्रातील FYJC म्हणजेच, अकरावी अॅडमिशन लिस्टचं काम NYSA Asia या कंपनीला देण्यात आलं, पण अकरावी प्रवेश प्रक्रीयेत या पोर्टलमधील अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या. एवढंच नाहीतर काही काळासाठी या कंपनीचं पोर्टल क्रॅश झाल्यामुळं विद्यार्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण विभागानं या कंपनीवर काहीही कार्यवाही केली नाही किंवा याप्रकरणी कंपनीला कोणत्याही दंड ठोठावला नाही.

पाहा व्हिडीओ : EXCLUSIVE :परीक्षेच्या गोंधळाला राज्य सरकार नाही, तर कंपनीच जबाबदार: न्यासा कंपनी संचालक पुनीत कुमार

जुलै 2018 ला उत्तरप्रदेशातील UPSSC च्या अजून एका परीक्षेचे कंत्राट NYSA कडे होते. या परीक्षेत परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फोडून पेपर लीक करण्यात आला होता काही विद्यार्थांच्या सतर्कतेमुळं ही बाब लक्षात आली. त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस आधी एजंट लोकांना पोलिसांनी पकडून सदर परीक्षा रद्द करायला लावली होती. या परीक्षेनंतर UPSSC ने NYSA ला ब्लॅकलिस्ट केलं. NYSA याविरुद्ध उच्च न्यायालयात गेल्यावर, UPSSC ने NYSA ची बाजू न ऐकताच ब्लॅकलिस्ट केलं, असा ठपका कोर्टानं ठेवला आणि ब्लॅकलिस्टमधून काढलं. आता हे सगळं असताना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ या कंपनीने घातला. त्यानंतर महाराष्ट्र सरकार या कंपनीवर आता नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच

<a href="https://ift.tt/3CQMENl Department Exam : आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात, केंद्र नोएडात; हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे म्हणाले....

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/health-dept-exam-date-announced-health-department-will-be-held-on-october-24-and-31-october-1005326
0 Comments