<p>मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यात पावसानं आणि पुराच्या पाण्यानं थैमान घातलंय. पावसामुळे अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे अनेक भागातील पूल पाण्याखाली गेले होते. आज दोन दिवसांनी पुलावरील पाणी ओसरल्यानंतर लातूरच्या बाकली बसपूर येथील मांजरा नदीवरील पूलच वाहून गेल्याचं दिसतंय. पुलावरुन पाणी गेल्यानं निलंगा-शिरुर अनंतपाळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे राणी अंकुलगा, बसपूर, बाकली, केळगाव अशी वाहतूक ठप्प आहे. लोकांना १५ किमी वळणाचा रस्ता वापरल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे पूल पुन्हा बांधण्याची मागणी केलीय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rain-update-latur-rain-update-the-bridge-over-the-manjara-river-was-swept-away-in-the-flood-waters-1005774
0 Comments