MPSC Result : विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून सिलॅबसवर लक्ष केंद्रीत करुन अभ्यास केल्यास आणि त्याला सातत्य, संयमाची जोड मिळाल्यास यश हे हमखास मिळते हे बीडच्या प्रियंका मिसाळच्या उदाहरणावरुन लक्षात येतं. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेतून प्रियांकाची तहसीलदार पदासाठी निवड झाली आहे.

प्रियंका भास्कर मिसाळ ही मुळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची. आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका तर वडील मुख्याध्यापक. प्रियंकाचे शिक्षण दहावीपर्यंत बीडमध्ये तर बारावी औरंगाबादमध्ये पूर्ण झाली. 2015 साली तिने नागपूरच्या डेन्टल कॉलेजमधून बीडीएसची पदवी घेतली. त्यानंतर तिने एमपीएससी करायचा निर्णय घेतला.

एमपीएससी करताना सुरुवातीला आलेल्या अपयशामुळे प्रियंका खचली नाही. उलट तिने अपयशाची कारणे शोधली आणि जोमाने अभ्यास केला. 2019 साली ती सहायक कक्ष अधिकारी निकालात राज्यात प्रथम आली. जून 2019 पासून ती मंत्रालयातील जलसंपदा विभागात सहायक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाली. त्यानंतरही तिने अभ्यास सुरुच ठेवला आणि राज्यसेवा परीक्षेतून तिने तहसीलदार या पदाला गवसणी घातली. या यशात आपल्या आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रियंका सांगते.

अभ्यास करताना मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे असं प्रियंका म्हणते. तसेच योग्य मार्गदशनाचीही आवश्यकता असून आपले हित जपणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असल्याचं ती सांगते.

स्पर्धा परीक्षेतील यशाचे सूत्र
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सिलॅबस ओरिएंटेड अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे आपण स्वत: विश्लेषण करणे गरजेचं असल्याचं प्रियंका सांगते. कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त रीव्हिजन करणं आवश्यक आहे. महत्वाच्या फॅक्ट्स आणि शॉर्ट पॉईन्ट्स काढणे, त्याची उजळणी करणे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे यातून कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं शक्य आहे असं प्रियंका मिसाळने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

राज्यसेवेचा निकाल जाहीर
मंगळवारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (MPSC) चा अंतिम निकाल जाहीर झाला. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे निकाल लावण्याची मागणी करत होते. अखेर मंगळवारी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/3ikExkq Result : महाराष्ट्र वन सेवेचा निकाल जाहीर, मुलांमध्ये नगरचा वैभव दिघे तर मुलींमध्ये पुण्याच्या पुजा पानसरेची बाजी

<a href="https://ift.tt/2WnHJUu Result : राज्यसेवा परीक्षेत जळगावची मानसी मुलींमध्ये राज्यात पहिली, मानसी म्हणाली, अखेर...

<a href="https://ift.tt/3F6rtJh Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mpsc-result-priyanka-misal-of-beed-succeeds-with-perseverance-and-restraint-selected-as-tehsildar-1005639
0 Comments