<p style="text-align: justify;">गेले दोन दिवस बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मराठवाड्यात इतकं नुकसान होऊनही कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. त्यांना याचं गांभीर्य वाटत नाही का? असा परखड सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर बीड जिल्ह्यातील पावसाची आणि पूरस्थिती इतकी भयंकर असतानाही, राष्ट्रवादीचे नेते मात्र सोहळे साजरे करत होते, असा आरोप पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांनी केला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pankaja-munde-exclusive-isn-t-the-government-serious-about-the-flood-situation-in-marathwada-question-of-pankaja-munde-1005631
0 Comments