<p>अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या औरंगाबादेत दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला . औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव ,कन्नड ,वैजापूर, गंगापूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. सोयगावच्या बनोटी गावात नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. अजूनही काळेकुट्ट ढग आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aurangabad-soygaon-banoti-river-flooded-water-infiltrated-the-village-1005929
0 Comments