समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिमच, मेहुण्याबद्दल माहिती देत नवाब मलिकांचा आरोप

Nawab Malik vs Sameer Wankhede : गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बोगस जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप करत आहेत. यात ते दररोज नववीन खुलासे करताना दिसत आहेत. रविवारीही पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी सायंकाळी नवाब मलिक यांनी एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. रविवारी, याबाबत खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहेत. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून वानखेडे यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. आपली आयडेंटिटी ओपन होईल, यासाठी वानखेडे यांनी घटस्फोट दिला.

Who is this person ?
What is his relation with Dawood Wankhede and Sameer Dawood Wankhede ?
Please let us know pic.twitter.com/jGBUmLCjPK
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 30, 2021

यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार नवाब मलिक यांनी घेतला. दिवाळीनंतर भाजपचा भांडाफोड मी करणार आहे. त्यानंतर मात्र भाजपवाले राज्यात कुठेही तोंड दाखवू शकणार नाहीत. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, असं नवाब मलिक म्हणाले. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं  होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं.

याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, नीरज गुंडे हा मोठा चोर आहे. तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होतो, म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंचं सांगणं आहे की, किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट त्या कंपनीमध्ये मोहिज कंबोज याचा मनूभाई आगीचा नावाचा एक नातेवाईक होता. साडे तेरा कोटी रुपये ते त्याने घेतले आहेत. मोहित कंबोज चोर आहे, त्याचा नातेवाईक देखील चोर आहे. आणि खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/i-stand-by-my-statement-that-sameer-wankhede-on-post-by-forging-sc-certificate-says-nawab-malik-1010403

Post a Comment

0 Comments