एनसीबीच्या दक्षता पथकाकडून हैनिक बाफना यांची चौकशी

समीर वानखेंडेवर झालेल्या आरोपांनंतर एनसीबीच्या दक्षता पथकानं हैनिक बाफना यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट करताना वादग्रस्त पंच किरण गोसावी यांचा निकटवर्तीय असलेल्या सॅम डिसुझा यांचं नाव घेतलं होतं. आणि त्यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटी रुपयांच्या डीलसंदर्भात बोलणी केल्याचा दावा केला होता. पण आपण सॅम डिसुझा नसून हैनिक बाफना असल्याचा दावा पालघरच्या या व्यक्तीनं केला आहे. आणि प्रभाकर साईल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केलीय. या पार्श्वभूमीवर हैनिक बाफना यांना एनसीबीच्या पथकानं चौकशीला बोलावल्यामुळे त्यात काय माहिती पुढे येते हे महत्वाचं ठरणार आहे.

ड्रग प्रकरण हे भाजपचं षडयंत्र : नवाब मलिक

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजपवर निशाणा साधला. ड्रग प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत आणि विधिमंडळ अधिवेशनात भाजपचं पितळ उघडं पाडू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिलाय.

बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती.

बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती

बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यापारी सुबोध काकानी यांच्या घर व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी आयकर विभागाकडून सुरू.

लालपरी अखेर धावली! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शासनाकडून मागण्या मान्य

सामान्य माणसांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-october-30-2021-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1010207
0 Comments