Breaking News LIVE Updates : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर...

Kranti Redkar : तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका; क्रांती रेडकर-वानखेडे यांनी मागितली सुरक्षा

Maharashtra News : मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत. तसेच, आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे, अशी मागणीही क्रांती रेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना केली.

क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून सातत्यानं होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मलिकांनी दावा केला होता की, समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मराठी नसून मुस्लिम आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर केली. दरम्यान, नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले.

IND vs NZ, T20 World Cup: टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडचा 8 गडी राखून विजय

IND vs NZ, T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध 'करो या मरो'च्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव झाला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.  भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे.

Rajinikanth Discharged: सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Rajinikanth Discharged: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth) यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद आहे. उद्यापासून सुरू होणारा दिपावलीचा सण रजनीकांत यांना त्यांच्या घरी साजरा करता येणार आहे. रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील (Chennai) कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल होण्याच्या चार दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

from maharashtra https://ift.tt/3nMZWo5
via IFTTT

Post a Comment

0 Comments