Breaking News LIVE : शाहीन चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर, भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्यानं भारताला धोका नाही

Breaking News LIVE Updates, 2 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती
Gandhi Jayanti 2021 :  देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती.  सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. स अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

दीर्घकाळापासून प्रलंबित  महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
मुंबई :  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर काल महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील 4534 उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.महावितरण कंपनीतील विद्युत  सहाय्यक  पदांच्या एकूण 5000 पदांसाठी 9 जुलै  2019 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 466 जागा वगळता उर्वरित 4534 जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे.यानुसार खुल्या प्रवर्गातून 1984 पदांचा तर अनुसूचित जातीसाठी 375 अनुसूचित जमातीसाठी 236, विमुक्त जातीसाठी 109, भटक्या जमाती(ब)साठी 80, भटक्या जमाती ( क)साठी 118, भटक्या जमाती (ड)साठी 44, विशेष मागास प्रवर्गासाठी 81 व इतर मागास वर्गासाठी 1507 पदांचा निकाल जाहीर  करण्यात आला आहे.

Mumbai Unlock: मुंबईत 7 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी

Mumbai Unlock : राज्यात आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालल्यानं आता हळू हळू निर्बंध शिथिल केले जाऊ लागले आहेत.  मुंबई महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळांमध्ये एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करून धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी 7 ऑक्टोबर पासून देण्यात आली आहे.

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार  असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.  यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-october-2-2021-maharashtra-rain-update-political-news-1005923

Post a Comment

0 Comments