<p>प्रत्येक घरात दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे..दिवाळीच्या दिवसात घराला कंदील आणि इतर रोषणाई केली जाते. मात्र रोषणाई करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर किती मोठं संकट ओढवू शकतं याची प्रचिती साताऱा शहरात आलीय.. साताऱ्यामध्ये दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना, मोरे कॉलनीत राहणऱ्या पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना वीजेचा धक्का लागला.. ज्यात सुनील पवार यांचा जागीच मृत्यू झालाय. तर सुनील यांच्या पत्नी मंजूशा, मुलगा श्रवण आणि ओम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-satara-electric-shock-to-the-whole-family-while-lighting-1010414
0 Comments