<p>महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडलीय. ती म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर.. जालन्यातील साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी, ईडीनं काल खोतकरांच्या घरी झाडाझडती घेतली. सकाळी ८ पासून ईडीच्या १२ जणाच्या पथकानं सुरु केलेली शोधमोहीम मध्यरात्री दोन पर्यंत सुरु होती. दुसरीकडे खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये देखील ईडीनं छापेमारी केल्याचं कळतंय. </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shiv-sena-arjun-khotkar-house-was-raied-by-ed-till-2-am-1014860
0 Comments