नोकरभरती परीक्षेत पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव समोर

Pune News : देशभरात होणाऱ्या वेगवेगळ्या नोकरभरतीचे पेपर फोडून लाखो रुपयांना विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. याच टोळीनं 31 ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीचा पेपरही याच टोळीनं फोडला होता आणि देशभरात रद्द करण्यात आलेल्या सैन्य भरती परीक्षेचा पेपरही याच टोळीनं फोडल्याचं समोर आलं आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला ही माहिती मिळाली आहे. आर्मी इंटलिजन्सनं अटक केलेल्या लष्करातील हवालदार अनिल चव्हाणके याच्या ऑडिओ क्लिपमधून घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे पोलीस याबाबत घोटाळा नसल्याचा दावा करत असताना समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस नेमकं काय दडवण्याचा प्रयत्न करतायत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

31 ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचं उघड झाल्यावर 27 नोव्हेंबरला पुणे सायबर सेलकडे याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र सैन्य भरती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्मी इंटेलिजन्सला आठ नोव्हेंबरलाच हा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा छडा लागला होता. त्याचबरोबर या टोळीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरतीचा पेपरही फोडण्यात येणार असल्याचं आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवारकडून साडेबारा लाख रुपये घेण्यात येणार असल्याचं आर्मी इंटेलिजन्सला समजलं.

आर्मी इंटेलिजन्सला ही माहिती आर्मीत हवालदार म्हणून काम करणाऱ्या अनिल चव्हाणके यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधून मिळाली होती. ही माहिती आर्मी इंटेलिजन्सने पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आणि आर्मी इंटेलिन्जसने नऊ नोव्हेंबरला लगेच नाशिकहून अनिल चव्हाणके, सांगलीहून त्याचा साथीदार प्रवीण पाटील आणि पुण्यातून महेश वैद्यला अटक केली. मात्र आता पिंपरी-चिंचवड पोलीस त्यांच्या तपासात आरोग्य विभागात कोणताही घोटाळा झालाच नसल्याचा दावा करत आहेत. फक्त सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एजंटला आपण अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/3xCloRd Vaccine : लसीकरण करण्यात राज्य सरकार अपयशी?

<a href="https://ift.tt/3E8zP26 Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गाची जबाबदारी केंद्र सरकारचीच, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-news-paper-leak-racket-gang-exposed-in-recruitment-exams-in-front-of-shocking-reality-from-audio-clip-1015380

Post a Comment

0 Comments