Devendra Fadnavis on Nawab Malik : ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये...

<p>अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज संबधात केलेल्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सर्वांना माहित आहे. नवाब मलिक यांनी फोटो पोस्ट केलाय, त्यासंदर्भात रिव्हर मार्चच्या संदर्भातील लोकांनी स्पष्टीकरण दिलेय. आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. चार वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्यांना आज सापडलाय. त्या व्यक्तीशी आमचा संबध नाही. गाण्याच्या शुटींगवेळी सर्व फोटो काढण्यात आले आहेत. सर्व टीमने फोटो काढले होते. पण नवाब मलिक यांनी फक्त माझ्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केलाय. यावरुन त्यांची मानसिकता दिसतेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-nawab-malik-underworld-relationships-devendra-fadnavis-1010527

Post a Comment

0 Comments