<p>धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील तापमान सात अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचली आहे यामुळे थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळी घराबाहेर पडत असून शहराच्या विविध भागात नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी घसरण होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून जिल्ह्यातील वाढती थंडी रब्बी हंगामाच्या पिकांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगण्यात येत आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-citizens-enjoy-winter-in-dhule-district-1015371
0 Comments