Mahatma Phule Death Anniversary: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' का नाही?

मुंबई: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत म्हणजे महात्मा जोतिबा फुले.  स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी आतापर्यंत सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. मात्र सरकारं बदलली तरीही ही मागणी आजही कायम आहे.  फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सरकारनेही 2016 मध्ये तशी शिफारस केंद्राकडे केली होती.

1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका (मरणोत्तर), नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला.

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. समाजासाठी खूप मोठं काम करणारे हे फुले दाम्पत्य अद्यापही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं नाही.

<a class="embedKoo-koocardheader" style="background-color: #f2f2ef !important; padding: 6px; display: flex; border-bottom: 1.5pt solid #e8e8e3; justify-content: center; text-decoration: none; color: inherit !important;" href="https://ift.tt/2ZCPDe9" target="_blank" rel="noopener" data-link="https://ift.tt/3p8H9UV App
दलित उत्थान और महिला सशक्तिकरण के लिए सदैव समर्पित महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जी को पुण्यतिथि पर सादर नमन।
View attached media content
- Nitin Gadkari (@nitin.gadkari) 28 Nov 2021

<script src="https://ift.tt/3w6q9ly>
आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :

पुरस्कारार्थीचे नाव                                         वर्ष
1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972)   1954
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 ) 1954
3. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970) 1954
4. डॉ. भगवान दास (1869 – 1958) 1954
5. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 ) 1955
6. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 ) 1955
7. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 ) 1957
8. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 ) 1958
9. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 ) 1961
10. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 ) 1961
11. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963) 1962
12. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 ) 1963
13. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 ) 1963
14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 1966
15. इंदिरा गांधी (1817 - 1984 ) 1971
16. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 ) 1975
17. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 ) 1976
18. मदर टेरेसा (1910 - 1997 ) 1980
19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 1983
20. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 ) 1987
21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 ) 1988
22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 1990
23. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 ) 1990
24. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 ) 1991
25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 1991
26. मोरारजी देसाई (1896 - 1995 ) 1991
27. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958) 1992
28. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 ) 1992
29. सत्यजीत रे (1922 - 1992 ) 1992
30. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 ) 1997
31. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 ) 1997
32. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931) 1997
33. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 ) 1998
34. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 ) 1998
35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 ) 1999
36. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 ) 1999
37. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 ) 1999
38. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 ) 1999
39. लता मंगेशकर (जन्म 1929 ) 2001
40. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 2001
41. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 2009
42. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 2014
43. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 2014
44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 2015
45. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 2015
46. प्रणब मुखर्जी (2019)
47. भूपेन हजारिका (मरणोत्तर) (2019)
48. नानाजी देशमुख (मरणोत्तर) (2019)

source https://marathi.abplive.com/news/india/why-mahatma-phule-and-savitribai-phule-do-not-have-bharat-ratna-1015032

Post a Comment

0 Comments