<p>राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आज दोन वर्षे पूर्ण करतंय. दोन वर्षांपूर्वी नाट्यमय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय आव्हानांवर मात करत सरकारनं दोन वर्षे पूर्ण केलीत. कोरोना आणि अनेक नैसर्गिक संकटांचा सामना या काळात सरकारला करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपनं सरकारला घेरण्याची एकही संधी या दोन वर्षांत सोडली नाही. ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपनं आजही सरकारवर हल्लाबोल करायचं ठरवलंय. त्यासाठी भाजपचे महत्त्वाचे नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीत माजी मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामगिरीवर भाष्य करणार आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maha-vikas-aghadi-mva-government-complete-2-years-1015034
0 Comments