Nawab Malik vs Mohit Kamboj : मोहित कंबोज यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले कंबोज...

<p>आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे. &nbsp;किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावरुन आता मोहित कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. माझी नवाब मलिकांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगा असा सवाल कंबोज यांनी केला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mohit-kamboj-replies-to-nawab-malik-1011495

Post a Comment

0 Comments