<p>दिल्लीत आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कृषी कायदे रद्द करणारं विधेयक मांडलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावलाय. याशिवाय इंधन दरवाढ हा अधिवेशनात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. लखीमपूरच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक राहतील अशी चिन्हं आहेत. डेटा सुरक्षेसंदर्भातील विधेयक तसेच क्रिप्टो करन्सी विधेयकही याच अधिवेशनात मंजूर करण्याचा सरकारचा मानस आहे. बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याबाबतच्या विधेयकासह 26 विधेयकं सरकारच्या पटलावर आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची झलक पूर्वसंध्येला पाहायला मिळाली. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी गैरहजर राहिल्याने विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/india-winter-session-of-parliament-in-delhi-starts-today-1015170
0 Comments